डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे निर्माते...!-डॉ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी


प्रतिनिधी : भिमराव कांबळे

अहमदपूर दि.26 एफ्रील 2023

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एका विशिष्ट जाती पूरते किंवा दलितांपूरते कार्य नव्हते तर संबंध भारतीयांसाठी कार्य होते ते ख-या अर्थाने आधुनिक भारताचे निर्माते होते असे प्रतिपादन साहित्य संगीत कला अकादमी चे अध्यक्ष तथा यूवक नेते डॉ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी केले.

ते मौजे डोंगरज ता.चाकूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजीत कार्यक्रमात प्रमूख वक्ते म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सरपंच शंकरराव मूळे हे होते त तर प्रमूख पाहुणे म्हणून चेअरमन दिनकराव कदम,माजी सरपंच माधव नवलागीरे, शिवराज थावरे,पोलीस पाटील धोंडिबा पाटील,नारायण कदम,भिवाजी कदम,लक्ष्मणराव मूळे,प्रविण मूळे आदींची उपस्थिती होती.

पूढे बोलताना डॉ.सूर्यवंशी म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू समाजापूढे येण्याची गरज आहे.तरच ख-या अर्थाने बाबासाहेब आंबेडकर समजून घेता येतील.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे बॅरिस्टर वकील होते.पत्रकार,सिध्द हस्त लेखक, प्राध्यापक,
विचारवंत,उत्तम वक्ते , वृत्तपत्राचे संपादक, भारतीय संविधानाचे शिल्पकार,बौध्द धम्म चक्रप्रवर्तक,खासदार,आमदार,मंत्री,जलतज्ञ,संस्थाचालक,स्त्री मूक्तीदाते, एका राजकीय पक्षाचे संस्थापक,अर्थतज्ञ,मानव वंश शास्रज्ञ,शिल्पकार, चित्रकार अशा विविधांगी भूमीका पार पाडल्या आहेत. बाबासाहेबांनी संबंध आयुष्यभर संघर्ष केला आहे.कधी गरीबीशी कधी जातीवादाशी तर कधी इथल्या मनुवादी व्यवस्थेशी. संघर्षाला ही पुरून उरणारा महापुरूष म्हणून बाबासाहेबांचे नांव घ्यावे लागेल पण इतिहासाने पर्यायाने प्रस्तावित व्यवस्थेने बाबासाहेबांच्या सकल कल्याणाच्या कामाची नोंद घेतली नाही.एका जातीपूरतं मर्यादीत करण्याचं काम जाणीव पूर्वक केलं.संघर्षाशिवाय नवनिर्मिती अशक्य आहे हेच बाबासाहेबांनी आपल्या कृतीने सिध्द केले.तेंव्हा आंबेडकरी जनतेने कुठल्याही संघर्षाला न डगमगता पूढे आले पाहीजे अशी अपेक्षा व्यक्त केली.संविधानाची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे या साठी आंबेडकरी जनतेने जागृत राहून आग्रही रहावे असेही अवाहन शेवटी केले.
या वेळी अध्यक्षीय समारोप करताना सरपंच शंकरराव मूळे यांनी म्हटले की, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने गावाच्या सर्वांगीन विकासासाठी सर्वांच्या सहकार्याने कायापालट करून गावाच्या समन्यायी विकासासाठी आपण पूढाकार घेण्यात असल्याचे सांगीतले.तसेच समाजाने घेतलेल्या चांगल्या निर्णयाच्या पाठीशी संपूर्ण गाव खंबीर पणाने सोबत राहू असे अश्वासन दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन माधव हरगीले, यांनी केले तर आभार बालाजी देवकत्ते यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दत्ता जाभाडे,बाबूराव जाभाडे सूभाष जाभाडे,अनिल जाभाडे,दशरथ जाभाडे, मारोती जाभाडे,वैजनाथ जाभाडे आदींनी पूढाकार घेतला.