आदिवासी पारधी महासंघ च्या नाशिक जिल्हाध्यक्ष पदी आकाश साळुंके यांची सार्थ निवड



    रविवारी अजंग येथे राज्यस्तरीय बैठक व सभा संपन्न झाली सदर बैठकीस प्रदेश अध्यक्ष श्री.आप्पासाहेब साळुंके ,महासचिव श्री.रा.ना. सोनवणे यांच्या नेतृत्त्वाखाली साळुंके यांची नाशिक जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.आदिवासी समाजाला कायम न्याय देण्याचे काम त्यांनी केले असून शासनाच्या विविध योजना यांच्या पर्यंत ते नेहमी पोहचवत असतात असे महासचिव रा.ना. सोनवणे यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांना नाशिक जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

     ते नक्कीच याच सोन करतील अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली या बैठकीस उपस्थित संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब साळुंके,महासचिव रा. ना. सोनवणे,महिला प्रदेश अध्यक्षा रत्ना चव्हाण, उपाध्यक्ष बापू पारधी ,समाधान साळुंके, मुख्य सचिव आण्णा चव्हाण ,संघटक दत्तू चव्हाण ,सल्लागार बळीराम चव्हाण,विभागीय अध्यक्ष किशोर चव्हाण ,रवींद्र चव्हाण , जगन्नाथ चव्हाण , भिका पहिलवान, तुषार चव्हाण ,चंद्रशेखर चव्हाण व विविध जिल्ह्यातून आलेले समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते सर्वांनी त्यांच्या निवडी बद्दल स्वागत केले व शुभेच्छा दिल्या