खेड शहरवासिय पाण्यासाठी "व्याकुळ"


    सुर्यकांत बडबे खेड प्रतिनिधी

          येथील नगर प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शहरवासियांवर बुधवारी पिण्याच्या पाण्यासाठी व्याकुळ होण्याची वेळ आली. दरम्यान  उद्धव बाळासाहेब ठाकरे शैवसेना शहर कार्यकारच्या वतीने प्रशासनाला निवेदन देत तात्काळ पाणीपूरवठा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

    वाढत्या उष्म्यामुळे आधीच रहिवासी मेटाकुटीस आलेले असताना पाणीपुरवठाच न झाल्याने तीव्र संताप  व्यक्त करण्यात येत आहे. निवेदन देताना शहरप्रमुख दर्शन महाजन, महिला आघाडी प्रमुख माधवी बेर्डे, उपशहरप्रमुख शैखर पाटणे.,माजी नगर सेवक अंकुश विचारे, विभाग प्रमुख राजू  कवळे, सचिन खेडेकर ,सुवर्णा सदरे आदी उपस्थित होते.