भरणेतील "त्या" बांधकामावर पडणार हातोडा, अनंत खोपकर, विलास शेळके यांच्या प्रयत्नांना यश


   सूर्यकांत बडबे खेड (रत्नागिरी ) प्रतिनिधी   

    मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नाका येथे सुजीत फागे यांनी उभारल्या अनधिकृत बांधकामावर लवकरच हातोडा पडणार आहे. याबाबते लेखी पत्र राष्ट्रीय महामार्ग उपविभाग रोहा/रायगडचे सहाय्यक अभियंता यांनी येथील उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे.

     या अनधिकृत बांधकामाबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते अनंत खोपकर यांनी कोकण आयुक्ताना लेखी निवेदनादूवारे कळविले होते. तसेच डाॕ. विलास शेळके याःनीहि याबाबतची लेखी तक्रार येथील तहसिलदार तसेच पोलीस निरिक्षकांकडे केली होती.

      दरम्यान,महामार्ग मध्यरेषेपासून ३७ मिटर व नियंत्रण रेषा अनागरी भागात महामार्ग हद्दीपासून ५० मिटर इतकी असून त्यापलीकडेच बाःधकाम करणे बंधनकारक असते. श्री. फागे याःनी केलेले हे बांधकाम कोणतीहि परवानगी न घेता करण्यात आले असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामूळे श्री. फागे यांनी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ पथकिनारवर्ती नियमाचा भंग केल्याचे उघड झाले असून योग्य ती कारवाई करण्याचे लेखी पत्र येथील उपविभागीय अधिकारी याःना महामार्ग सहाय्यक अभियंतांनी दिले आहे.

       उपविभागीय अधिकारी या बांधकामावर कधी हातोडा घालणार याकडे तालुकावासियांच्या नजरा खिळल्या आहेत