संघर्षाचा अग्नी पेटला आहे..हा लढा आता खऱ्या अर्थाने सुरू झालाय....


प्रतिनिधी - रमेश करंजे (तळा)

            मुंबईत समस्त कोकण वासियांचा उद्रेक....हक्क अधिकाराच्या लढाईत, कोकणी माणूस मैदानात, कुणबी समजोन्नती संघाच्या मार्गदर्शनाखाली दादर येथे जोरदार आक्रोश निदर्शने. विनाशकारी रिफायनरी हटाव .. कोकण बचाव.. हा नारा देत आज शुक्रवार दि. २८ एप्रिल २०२३ रोजी, संध्याकाळी ६ वाजता दादर (पूर्व), रेल्वे स्टेशन जवळ येथे मुंबईतील विविध संघटनांच्यावतीने प्रचंड आक्रोश करून निदर्शने करण्यात आली.

     या आंदोलनात, कुणबी समाज संस्था,  कुणबी युवा, कुणबी महिला मंडळ, बळी राज सेना, कुणबी राजकिय संघटन समिती, वकील संघटना, ओबीसी जनमोर्चा, ओबीसी संघर्ष समिती, सर्व तालुका शाखा, विभागीय शाखा, भारतीय लोकसत्ताक संघटना तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. निदर्शने करताना युवा, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. आंदोलन स्थळी क्षणाक्षणाला प्रचंड गर्दी वाढत होती, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर तसेच मुंबईतील सर्वच विभागातील कार्यकर्ते सामिल झाले होते. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कोकणात विषारी प्रकल्प नको, चांगले प्रकल्प आणा, आम्ही त्याचे स्वागत करू, आम्हाला विकास हवा, पण कोकणचा भकास नको असा आक्रोश यावेळी करण्यात आला.