राशीन (प्रतिनिधी ):-जावेद काझी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून तसेच अहमदनगर दक्षिणचे लोकप्रिय खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांच्या प्रयत्नातून राष्ट्रीय वयश्री योजना मधून राशीन येथील श्री दिलीप सौताडे यांना अपंगासाठी वापरली जाणारी व्हिल चेअर सायकल वस्तू मोफत स्वरूपात मिळाली होती ती त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत ती व्हिल चेअर राशीन येथील
प्रसिद्ध श्री जगदंबा देवी चरणी अर्पण केली यामुळें अपंग ज्येष्ठ नागरिक यांना दर्शन घेणे इथून पुढे सुलभ होणार आहे या चेअरचा शुभारंभ आज जिल्हा बँक संचालक श्री अंबादास जी पिसाळ यांच्या शुभ हस्ते अपंग लाभार्थी अशोक डाेरले यांना बसवून करण्यात आला यावेळी सोबत तात्यासाहेब माने, सागर मोढळे, पुजारी अरुण रेणुकर, गुलाब सोनवणे साहेब, अमोल शेटे, इतर भाविक भक्त व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी लाभार्थी दिलीप सौताडे यांचा सत्कार जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक अंबादासजी पिसाळ यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना अंबादासजी पिसाळ यांनी देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेले राष्ट्रीय वयाश्री योजना अहमदनगर जिल्ह्यात खासदार साहेबांच्या माध्यमातून समाजापासून दुर्लक्षित असलेल्या दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ होत असल्याचे दिसून येत आहे या योजनेबद्दल भाविक भक्त , दिव्यांग , ज्येष्ठ नागरिक व इतर भाविक भक्तांनी पंतप्रधान व खासदार साहेबांचे अभिनंदन व्यक्त करून आभार मानले आहे. .