भडगांव प्रिमियर क्रिकेट लिगचा संघर्ष चॅलेंजर्स जेता



सुर्यकांत बडबे खेड प्रतिनिधी

        शहराजवळील श्रीकृष्ण क्रिकेट क्लब  आयोजित भड़गांव प्रिमियर लिग २०२३ संघर्ष चॅलेंजर्स संघाने जेतेपद तर मंगलमूर्ती संघाने उपविजेतेपद पटकावले.

          स्पर्धेत एकूण १२ संघांनी सहभाग घेतला होता. विजेत्यास रोख रक्कमा ५ हजार व चषक तर उपविजेत्यास ३हजार व चषक जेष्ठ समाजबांधव मधुकर पाष्टे याःच्या हस्ते देवून गौरविण्यात आले.

          दरम्यान अप्रतिम खेळाने अंतिम फेरीत पोहोचलेल्या व उपविजेत्या ठरलेल्या संघमालक समीर उसरे यांच्या मंगलमूर्ती संघातील सर्वच खेळाडूंसह भडगांव प्रीमियर लीगवर नांव कोरणाऱ्या संघमालक सुरज जोगळे व त्यांच्या सर्व खेळाडूंनी  दाखविलेल्या खिलाडूवृत्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.