दिनांक १२ एप्रिल ते १८ एप्रिल पर्यंत अखंड नाम, जप,यज्ञ सप्ताह सोहळा अतिशय आनंदात व उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये पार पडत आहे, समाजाच्या कल्याणासाठी परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने श्री स्वामी समर्थ नगर जत्रा हॉटेल आडगाव शिवार या केंद्रामध्ये तब्बल १६५ गुरुचरित्र पारायण करणारे पुरुष व महिला सेवेकरी तसेच भागवत, श्रीपाद श्रीवल्लभ, नवनाथ, स्वामी चरित्र, दुर्गा सप्तशती,मल्हारी सप्तशती, अशा सात दिवसाच्या अनेक सेवेकरी वर्ग आपली सेवा रुजू करत आहे,
महत्त्वाचे म्हणजे हा सप्ताह अखंड नाम जप यज्ञ म्हणजेच २४ तास प्रहर सेवा असणारा सप्ताह असतो. यामध्ये सकाळी ८ ते रात्री ८ महिला वर्ग तसेच रात्री ८ ते सकाळी ८ पुरुष वर्ग दर एक तासाला ६जण सेवा करत असतात यामध्ये २ जण विना वाजवतात २ जण २ जण माळ जप करतात, व जण स्वामी चारित्र वाचतात हे अखंड ७ दिवस २४ तास सेवा चालू असते याची सांगता १८ एप्रिल रोजी होणार आहे, दररोज ३ वेळा स्वामींची नैवेद्य आरती होत असते सकाळी भूपाळीआरती ८ वाजता १०.३० वाजता नैवेद्य आरती व सायंकाळी ६.३० वाजता नैवेद्य आरती अशा त्रिकाल आरत्या होतात या प्रसंगी देखील ४००-५०० भाविक सेवेकरी स्वामींच्या आरतीला देखील उपस्थित राहतात.