लिंगायत महासंघाच्या वतीने उदगीरात महात्मा बसवेश्र्वर जयंती उत्साहात साजरी



उदगीर:प्रतिनिधी 
लिंगायत महासंघ शाखा उदगीरच्या वतीने महात्मा बसवेश्र्वर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी उपजिल्हाधिकारी श्री.प्रविणजी मेंगशेट्टी साहेब,पोलीस उपअधिक्षक श्री.डॅनीयल बेन साहेब,आरोग्यदूत श्री.नामदेव कदम साहेब,मा.नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे साहेब,शि.भ.प उध्दव महाराज,जेष्ठ नेते शिवकुमार हसरगुंडे उपस्थित राहुन महात्मा बसवेश्र्वरांच्या प्रतिमेचे पूजन करुन जयंती साजरी करण्यात आली.
महात्मा बसवेश्र्वर जयंती उत्सवा निमित्य लिंगायत महासंघाचे ता.संघटक अॅडो.निलेश हिप्पळगे यांच्या सहकार्याने फळवाटप करण्यात आले व शिमाशंकर शेळके यांच्या कडुन प्रसादाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी महात्मा बसवेश्र्वर जयंती उत्सवा निमित्य लिंगायत महासंघाचे प्रदेश सरचिटनिस चंद्रकांत काला पाटील,जिल्हाउपाध्यक्ष बस्वराज ब्याळे,ता.अध्यक्ष चंद्रकांत सिरसे,
ता.उपाध्यक्ष प्रा.महेश धोंडिहिप्परगेकर, शहराध्यक्ष सुभाष शेरे,शहर उपाध्यक्ष प्रा.प्रकाश करेप्पा,सचिव अशोक मंठोळे,शहर संघटक अशोक तोंडारे यांनी अहोराञ परीश्रम घेतले.



महात्मा बसवेश्र्वर जयंती उत्सवा निमित्य बापूराव शेटकार,विजय शेटकार,संगण्णा बिरादार,कालिदास सिरसे,दयानंद टाकळे,शिवशंकर बापाटले,संतोष खरोबे,माधव पाटील,पप्पु कपाळे,महादेव चिमेगावे,नागनाथ पाटील,रेवणप्पा बारुळे,उमाकांत द्दाडे,प्रसाद सिरसे, राजकुमार समगे,ऋषिकेस पाटील, लक्ष्मण सोनाळे,प्रदिप नंदगावे, मा.सरपंच गोविंद पाटील, शिवप्रसाद स्वामी,शुभम शेळके, अक्षय शिवशेट्टे यांच्यासह अनेक बांधव उपस्थित होते. तसेच सुञसंचलन शिवसांब स्वामी यांनी केले तर प्रास्ताविक प्रा.महेश धोंडिहिप्परगेकर यांनी मांडले व आभार प्रदर्शन संजय शिवशेट्टे यांनी मानले.