मुकेश निरुणे/उदगीर - academy of Maritime education and Training (AMET)university चेन्नई (तामिळनाडू )येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय अंतर विद्यापीठ Tug Of War (रस्सी खेच ) महिला स्पर्धेत येथिल शिवाजी महाविद्यालयाची खेळाडू कु. कांबळे निकिता राजकुमार (बी.एस्सी. प्रथम वर्ष ) या विद्यार्थ्यीनीला कौशल्याच्या आधारावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या महिला संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त झाली .
खेळाडूच्या यशाबद्दल किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील, सचिव ज्ञानदेव झोडगे, कौषाध्यक्ष चामले नामदेव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विनायक जाधव, उपप्राचार्य प्रा.डॉ.एस.व्ही. जगताप, उपप्राचार्य प्रा. डॉ. आर. एम. मांजरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्रचार्य प्रा. विलास भोसले, पर्यवेक्षक प्रा. जी. जी. सूर्यवंशी, शिक्षक व कर्मचारी, व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले. प्रा, नेहाल खान, प्रा. गजानन माने यांनी तंत्रशुद्ध पद्धतीने मार्गदर्शन केले.