श्री. कालिका पतसंस्थेस २४.३७ लाखांचा नफा


प्रविण चौरे ओझर प्रतिनिधी

    ओझर येथील श्री कालिका ग्रामिण बिगरशेती सह पतसंस्थेस या आर्थिक वर्षात २४.३७ लाखांचा नफा झाल्याची माहीती संस्थेचे चेअरमन संदिप सुभाष अक्कर यांनी दिली. मार्च अखेर संस्थेकडे ३ कोटी ४५ लाख रूपयाच्या ठेवी जमा झालेल्या असुन कर्जवाटप ३ कोटी २० लाख रूपयांचे झालेले आहे. संस्थेने विविध वित्तीय संस्थामध्ये १ कोटी ७४ लाख रूपयांची सुरक्षित गंतवणुक केलेली आहे. 

    संस्थेकडे विविध प्रकारचा एकुण ८३ लाख निधी जमा झालेला असुन संस्थेचे खेळते भागभांडवल ५ कोटी १० लाख रूपये आहे. कर्जवसुलीचे प्रमाण ९३.२३ टक्के असुन थकबाकी ६.७७ टक्के आहे. संस्थेचा सी डी रेषो ६३.६१ टक्के आहे. याप्रसंगी संस्थेचे व्हा. चेअरमन दयानंद अहिरे, संचालक राम शिरापुरे, नारायण अक्कर, श्रीकांत अक्कर, राहुल कोळपकर, पुष्कर जाधव, कारभारी जाधव, सचिन अक्कर, साधना शिरापुरे, रजनी अक्कर ,व्यवस्थापक राजेंद्र भावसार, कर्मचारी दिनेश कोळपकर, सचिन कावळे उपस्थीत होते.