शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत गावातील नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यास ग्रामसेवक एस.व्ही.मोरे यांच्याकडून टाळाटाळ.


अंबुलगा (बु) प्रतिनिधी, काकडे सदाशिव

           शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत शासकीय अनुदानावर ग्रामपंचायत मार्फत नागरिकांना विविध योजनांचा लाभ दिला जातो. यांमध्ये नवीन विहीर खोदणे, जनावरांसाठी पक्का गोठा बांधणे, कुक्कुटपालन व शेळीपालन शेड, वृक्षलागवड ई. विविध योजना नागरिकांना शासकीय अनुदानावर दिल्या जातात. 

           वरील विविध योजनांच्या मंजुरीसाठी ग्रामपंचायत मार्फत ग्रामसेवकांकडून काही कागदपत्रे दिली जातात. या योजनेतून फॉर्म ऑनलाईन करणे सुरू होऊन दोन महिने उलटून गेली असून यासाठी लागणाऱ्या कागदपत्रासाठी नागरिकांनी ग्रामपंचायत कडे दोन महिन्यांपूर्वी मागणी केलेली असून सुद्धा अद्यापही ग्रामपंचायत मार्फत कागदपत्रे देण्यास ग्रामसेवक एस.व्ही.मोरे यांच्याकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे गावातील नागरिक या कागदपत्रा-अभावी विविध योजनांपासून वंचित असून या योजनांचा लाभ मिळत नसल्याने गावातील नागरिकांतून तीव्र संताप व नाराजी व्यक्त केली जात आहे.

             या बाबीची श्री. अमोल ताकभाते, गटविकास अधिकारी, निलंगा यांनी गांभीर्याने दखल घेऊन लाभार्थ्यांना या विविध योजनांचा लाभ मिळावा यांसाठी ग्रामपंचायत मार्फत मिळणारी कागदपत्रे त्वरित देण्यात यावीत असे निर्देश ग्रामसेवकास देण्यात यावेत अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.