अहमदपूर प्रतिनिधी ( भीमराव कांबळे)
दि.22 एप्रिल2023
अहमदपूर तालुक्यातील मौ गंगाहिप्परगा येथे महात्मा बसवेश्वर महाराज यांची 892 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रसंगी शेकापूरे यांनी आपले मनोगत व्यक्त करतानामहात्मा बसवेश्वर महाराज (अन्य नावे: बसव,बसवण्णा, कन्नड: ಬಸವೇಶ್ವರ) (इ.स. ११०५ – इ.स. ११६५) हे कर्नाटकातील संत, समाजसुधारक होते. त्यांनीहिंदू धर्मातीलजातिव्यवस्थेविरुद्ध व अन्य हानिकारक प्रथांविरुद्ध संघर्ष केला. त्यांनी निर्गुण, निराकार एकेश्वरवादी श्रद्धेचा पुरस्कार केला. शालिवाहन शके दहाव्या शतकात कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील इंगळेश्वर-बागेवाडी या गावात ११०५ साली प्रतिष्ठित वीरशैव कुटुंबात बसवेश्वरांचा जन्म झाला. काहींच्या मते तो इंगळेश्र्वर (जि. विजापूर) या गावी झाला असावा. त्यांच्या जन्मकाळाविषयी मतभेद असले, तरी सामान्यतः त्यांचा जन्म वैशाखातील अक्षय्य तृतीयेला झाल्याचे मानले जाते. त्यांचे वडील मणिराज ऊर्फ भादरस हे बागेवाडी आगाराचे भांडारप्रमुख होते. त्यांच्या पत्नी मादुलांबा (मादंबा) परम शिवभक्त होत्या.
बसवेश्वरांच्या भावाचे नाव देवराज व बहिणीचे नाव नागम्मा होते. बसवेश्वर कर्मठ विधींना विरोध करत. त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी मुंजीची तयारी झाल्यावर ‘मला आधीच लिंगदीक्षा मिळाली आहे’ असे म्हणून मुंज करून घ्यायचे नाकारले आणि घर सोडून ते कूडलसंगम (जि. विजापूर) येथे निघून गेले. कृष्णा व मलप्रभा या नद्यांच्या संगमावरील कुडलसंगम येथे मोठे अध्ययन केंद्र होते. तेथे बसवेश्वरांनी बारा वर्षे वास्तव्य केले. कूडलसंगम येथे त्यांनी वेगवेगळ्या भाषा, धर्म, तत्त्वज्ञान इत्यादींचा अभ्यास केला. त्यांचा विवाह त्यांच्या मामाच्या मुलीशी झाला. तेव्हा ते सोलापुरातील मंगळवेढा येथे आले. तेथे ते एकतीस वर्षे राहिले.असी थोडक्यात माहिती दिली
तसेच जयंतीचे ध्वजारोहण गावातील प्रतिष्ठित नागरिक सरपंच सौ.मिनाताई लक्ष्मन कोमले,माजी सरपंच सुखदेवराव कदम, उपसरपंच नागेश बेंबडे,ग्रा.पं.सदस्य अरुण कदम यांच्या हस्ते झाले
तसेच गावातील नागरिक बापूराव मदने,मनोहर चामवाड, रमेश कदम, नामदेवराव फाजगे ,हनुमंतराव टाकळे, बाळासाहेब कदम, त्र्यंबकराव शेकापुरे ,प्रताप फाजगे, निवृत्ती मासुळे, लक्ष्मण फाजगे ,संजय भालेराव, पत्रकार अजय भालेराव, तसेच जयंती मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद शेकापुरे, उपाध्यक्ष नागेश बारोळे व सर्व जयंती मंडळाचे पदाधिकारी व सदस्य योगेश काडवदे, संतोष बारोळे, मारुती शेकापुरे, प्रवीण डेंगे, धर्मा चाटे, महादेव शेकापुरे, किरण शेकापुरे ,चंद्रकांत देवकते, उमाकांत व्हुनगुंडे, शिवप्रसाद स्वामी, तानाजी शेकापुरे,पंकज कदम, नंदकुमार शेकापुरे, निलेश गिरी ,तुकाराम कदम, मुरली कदम, राहुल जोंधळे, सुखदेव भालेराव,बंडु होनमोडे, इंद्रजित टाकळे, शरद देवकते,उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरसिंग गिरी यांनी केले तर आभार प्रदर्शन पवन पिटलवाड यांनी केले