कामांसाठी सुमारे 2 कोटी 35 लक्ष रू. निधी मंजुर


 उमरगा व लोहारा तालुक्यातील 23 गावांमध्ये स्मशानभूमी, स्मशानभूमी कडे जाणारे रस्ते व इतर कामांसाठी जिल्हा वार्षिक योजना 2022-23 अंतर्गत सुमारे 2 कोटी 25 लक्ष रू. निधी मंजुर झाला आहे. सदर कामांना मंजुरी देण्यासाठी आमदार ज्ञानराज चौगुले साहेब यांनी पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

यानुसार आष्टा ज., कोरेगाववाडी, बेलंब तांडा, पळसगाव,कसगी, गुगळगाव, येळी, राजेगाव, कानेगाव, फणेपुर, जेवळी, कास्ती बु., कास्ती खु., मार्डी, हराळी या गावांमध्ये स्मशानभूमी बांधकाम करणे, चंडकाळ व चिंचोली ज., येथे स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता करणे, तसेच तुगाव, कोरेगाव, गुंजोटी, व्हंताळ, कसगी, वडगाव गांजा या गावांमध्ये अंतर्गत रस्ते / गटार करणे या कामांसाठी सुमारे 2 कोटी 35 लक्ष रू. निधी मंजुर झाला असुन याबद्दल आमदार ज्ञानराजजी चौगुले यांनी पालकमंत्री मा.ना. तानाजीराव सावंत यांचे आभार मानले आहेत.