वेरूळ जैन गुरुकुल मध्ये 1995 बॅच च्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेसंमेलन



सतीश कोळी,शहर प्रतिनिधी खुलताबाद

 खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील पार्श्वनाथ ब्रह्मचारी आश्रम जैन गुरुकुल मध्ये गुरुदेव समंतभद्र विद्या मंदिर चे 1995 या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. यावेळी वेरूळ गावात व वेरूळ गुरुकुल मधून शिकून गेलेले सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्रित करण्यात आले होते.

दैनंदिन कार्यक्रमांमध्ये उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांचा शाळा व गुरुकुल तर्फेसत्कार करण्यात आला. तर गुरुजनांचे अनंत उपकाराची परतफेड म्हणून विद्यार्थ्यांमार्फत सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून दिला. या परिचयाअंतर्गत सध्या कोणत्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे या संदर्भातली माहिती विशद करण्यात आली.यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यथा शक्तीनुसार प्रशालेला आवशक् शैक्षणिक साहित्य व गरीब विद्यार्थ्याना शैक्षणिक मदत देण्याचे आश्वासन दिले. 

सर्व माजी विद्यार्थ्यांतर्फे सर्व गुरुजन व गुरुकुल मधील विद्यार्थ्याना मिष्टान्न भोज चे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमा चे आयोजन साठी प्रमुख भूमिका जितेंद्र पाटनी, दिगंबर राठोड, आप्पा वाघमारे, शशांक टोपरे,शेख मोबीन, शेख जावेद, काकासाहेब श्रीखंडे , राहुल गांधी, ऋषभ डाबरे, प्रवीण खुळे, महावीर बेदरकर,रूपाली शेवाळे, मेघा झारेकर ,अर्चना विटेकर, शेख शेहनाज, दुर्गा राठोड, शीतल मोटे , लतामिसाळ यांनी पार पाडली.कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.