बीबी येथील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलावर दारुड्याने केला हल्ला



    लोणार तालुक्यातील बीबी येथील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलावर दारुड्याने हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला. हा हल्ला नशेत असलेल्या माधव कुडकन या संशयीत आरोपीने केला. परिसरातील नागरिकानी या संशयित आरोपीला अनेकांनी पकडण्याचा प्रयन्त केला. परंतु, त्याने कुणाचेही न ऐकता अल्पवयीन मुलावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यानंतर मुलाची आई बालुबाई साळवे यांनी बीबी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. संशयीत आरोपी माधव कुडकन या आरोपीस पोलीस ठाण्यात बोलावून सोडुन देण्यात आले. पोलिसानी पंचनामा करुन गुन्हा दाखल केला आहे. अश्विनि सावळकर या घटनेच्या साक्षीदार आहेत. त्यानंतर ही पोलिसांनी या घटनेतील आरोपीला सोडून दिल्याने पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.