डॉ. आंबेडकर जयंती ढाळेगांव येथे उत्साहात साजरी


प्रतिनिधी : भिमराव कांबळे

प्रतीवर्षाप्रमाणे विश्वरत्न प. पु. बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मौजे ढाळेगाव ता अहमदपूर जि. लातूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सकाळी ठिक 9:00 वा. पंचाशिल ध्वजाचे धाजारोहन किनगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बोईनवाड यांच्या हस्ते झाले व त्यानंतर सामूहिक त्रिशरण, पंचशिला चे पठण करण्यात आले" शिका ! संघटीत व्हा ! संघर्ष करा ! " या बाबासाहेबांनी दिलेला मुलमंत्र लक्षात घेऊन शिक्षण प्रेमी भालचंद्र दयानंद गुळवे यांनी जि.प.प्रा.शाळेतील विध्यार्थ्यांना वही व पेनाचे वाटत केले प्रसंगी शाळेतील चिमुकल्या नी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  जिवनावर भाषणे केली त्यात इ. तिसरी वर्गात शिकत असलेल्या अपूर्वा अमरदीप कांबळे या विध्यार्थीनी च्या भाषनाने सर्वांचे लक्ष वेधले 

   भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज , लोकशाहीर अण्णाभाऊ साठे इ. महापुरुषांच्या प्रतिमेची गावातील प्रमुख सस्त्यावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली ढाळेगाव व परिसरातील हजारो भिम अनुयायी या भव्य शोभायात्रेस हजर होते. या जयंती दिनि प्रा. अशोक गुळवे यांनी भोजनदान दिले रात्री 10.00 वा. संजय वडगावकर यांचा भिम संदेश ऑकेस्ट्रा यांनी प्रबोधनपर गितं गायली.

  या कार्यक्रमासाठी आंबेडकर जयंती समितीचे अध्यक्ष्य सुशिल गुळवे व उपाध्यक्ष पांडुरंग कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशश्वी रित्या पार पडावा म्हणून - बबलु गुळवे, गोपाळ गुळवे, तुकाराम कांबळे , संघरत्न कांबळे, संतोष कांबळे, रमेश कांबळे, रतन कांबळे, राहुल कांबळे, समाधान भि. कांबळे, विठ्ठल कांबळे, माधव गुळवे, अमरदिप कांबळे, नागनाथ गुळवे, गिरीधर (जॉन्टी ) गुळवे समाधान कांबळे, उत्तम कांबळे, आदींनी मेहनत घेतली.